ठाकरे शिवसेनेच्या वतीने रेडीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

Edited by: दिपेश परब
Published on: June 24, 2024 10:04 AM
views 261  views

वेंगुर्ले : १९ जून रोजी शिवसेना वर्धापन दिनाचे औचित्य साधून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून रेडी जिल्हा परिषद महिला आघाडी यांच्यावतीने रेडी येथील दहवी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. 

यावेळी वेंगुर्ला तालुका प्रमुख यशवंत परब, वेंगुर्ला तालुका महिला संघटिका सुकन्या नरसुले, युवासेना तालुकाधिकरी पंकज  शिरसाट, अल्पसंख्यांक सेलचे तालुका प्रमुख रफिक बेग, रेडी विभागाचे विभाग प्रमुख नामदेव राणे, महिला उपतालुका संघटिका समृद्धी कुडव, विभाग प्रमुख रश्मी डिचोलकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. व त्यांनतर दहावी व बारावी च्या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तसेच देशभक्त शंकररावं गवणकर महाविदयालयाची रेडी गावातील विद्यार्थिनी शारदा प्रमोद नाईक हिने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक घेऊन B.M.S हि पदवी प्राप्त केली. याबद्दल तिचा विशेष सन्मान करण्यात आला. मान्यवरांच्या वतीने विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी व पालकांनी आपल्या मनोगतातुन संपूर्ण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे आभार मानले.