इन्सुली 8 नं शाळेत विद्यार्थांना शालेय साहित्याच वाटप

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थीसेनेचा पुढाकार
Edited by: विनायक गावस
Published on: June 26, 2023 15:04 PM
views 204  views

सावंतवाडी : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने इन्सुली शाळा नंबर ८ कोठावळे बांध येथे मुलांना वह्या पेन तसेच खाऊ वाटप करण्यात आले माजी शहराध्यक्ष तथा म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या पुढाकारातून तसेच शाळेचे अध्यक्ष प्रेमकांत वारंग यांच्या उपस्थितीत सदर वह्या पेन वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात आला सावंतवाडी तालुक्यातील विविध शाळांमध्ये वह्यावाटपचा कार्यक्रम मनसेच्या माध्यमातून राबविणार असल्याचे श्री सुभेदार म्हणाले यावेळी इन्सुली शाखाध्यक्ष सुरेंद्र कोठावळे दिनेश मुळीक मनविसे तालुकाध्यक्ष स्वप्निल कोठावळे प्रणित तळकर नंदू परब आदी पदाधिकारी तसेच शिक्षक वर्ग व पालक उपस्थित होते यावेळी शाळेचे अध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक यांनी उपस्थित मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.