लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाच्या वतीने दहावी बारावी उत्तीर्ण विध्यार्थ्यांचा सत्कार

Edited by: उमेश बुचडे
Published on: June 16, 2024 06:51 AM
views 281  views

कणकवली :  एखादी संस्था काढणं खूप सोपं असत मात्र ती टिकवण खूप कठीण असत मात्र लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ मागील 20 वर्षे सातत्याने सामाजिक शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहे. असे गौरवोदगार जिल्हा परिषद शाळा हळवल नं 2 चे मुख्याध्यापक शिमराम सुतार यांनी काढले. लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाच्या वतीने दहावी बारावी उत्तीर्ण विध्यार्थ्यांचा सत्कार कारण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष लवू परब, प्रशालेचे शिक्षक स्वप्नील सावंत, माजी उपसरपंच अरुण राऊळ, उद्योजक दिपक राऊळ, वामन परब. सान्वी गावडे, विजया चव्हाण, सचिव दिपेश परब, प्रकाश पवार, विकास गावडे, अनिकेत परब, उमेश परब तसेच विध्यार्थी व पालक उपस्थित होते. 

लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडी यांच्या माध्यमातून मागील 20 वर्ष अनेक सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. सण 2023 / 24 च्या दहावी बरावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मुलांचा मंडळाच्या वतीने शालेय साहित्य व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. 

तसेच गावात प्रथम आलेल्या दहावी व बारावीतील विध्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना सागर गावडे पुरस्कृत आकर्षक पारितोषिक देखील देण्यात आले. तसेच मंडळाचे कार्य दर्शविणाऱ्या वाह्यांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यात प्रशालेचे शिक्षक स्वप्नील सावंत यांनी मंडळाच्या कार्याचा गौरव करत मुलांना मार्गदर्शन केले. अध्यक्ष लवू परब यांनी आपले सामाजिक काम असेच सुरु राहणार असल्याचे सांगत उपस्थितांचे आभार मानले