शिक्षणमंत्री केसरकर मित्रमंडळाच्यावतीनं मुख्यमंत्री शिंदे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

आरोग्य तपासणी तसेच कॅन्सर निदान शिबिर व महा रक्तदान शिबिराचं आयोजन
Edited by: विनायक गांवस
Published on: February 09, 2023 19:10 PM
views 329  views

सावंतवाडी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिक्षणमंत्री दीपक केसरकर मित्रमंडळाच्यावतीनं विविध सामाजिक उपक्रमात राबविण्यात आले. उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथील आरोग्य तपासणी तसेच कॅन्सर निदान शिबिर व महा रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात २५ ते ३० रुग्णांनी कॅन्सर निदान शिबिरात सहभाग घेत निदान केलं. १८४ रूग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली तर अनेकांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला.


दरम्यान, मंत्री दीपक केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात केक कापून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिर्घायुष्यासाठी उपस्थितांनी प्रार्थना करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे तालुकाप्रमुख नारायण ऊर्फ बबन राणे, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष राजन रेडकर, सरपंच सेवा तालुका समन्वयक अब्जू सावंत, माजी नगरसेविका स्वप्ना नाटेकर, पुजा नाईक, लतिका सिंग, निलीमा चलवाडी, दीपक केसरकर मित्रमंडळाचे आबा केसरकर, नंदू शिरोडकर, गजानन नाटेकर, सुजित कोरगावकर, परशुराम चलवाडी, अभिजीत मेस्त्री, विशाल बांदेकर आदींसह बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.