बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल च्या वतीने 'स्वच्छतेसाठी एक तास’ श्रमदान उपक्रमाचे आयोजन

Edited by:
Published on: October 02, 2023 11:59 AM
views 108  views

कणकवली: बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल, कणकवली येथे महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून प्रशालेत केंद्र पुरस्कृत ‘स्वच्छता हीच सेवा’ या अभियानांतर्गत ‘स्वच्छतेसाठी एक तास’ श्रमदान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी शाळा आणि शालेय परिसर स्वच्छ करून स्वच्छतेचा आदर्श निर्माण केला. या प्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका गीतांजली कुलकर्णी  यांनी ‘स्वच्छतेसाठी एक तास’ या उपक्रमाची माहिती देऊन स्वच्छतेविषयी मागदर्शन केले.

सदर उपक्रम अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेच्या सचिव  सुलेखा राणे, बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका  गीतांजली कुलकर्णी, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडला.