अर्चना घारेंच्या वाढदिनी 'सफर पुस्तकांच्या दुनियेतील'...!

वाचन संस्कृती टिकवण्याची गरज असताना घारेंचा उपक्रम स्तुत्य ; मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा सावंतवाडीत भव्य पुस्तक व वैज्ञानिक खेळण्यांचं प्रदर्शन
Edited by: विनायक गावस
Published on: December 01, 2023 13:13 PM
views 145  views

सावंतवाडी : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष सौ. अर्चना घारे-परब यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांसह साजरा करण्यात येणार येत आहे.

अर्चना फाऊंडेशनच्यावतीने व पुस्तक विश्वच्या सहकार्यानं भव्य पुस्तक आणि वैज्ञानिक खेळण्यांच्या प्रदर्शनाचं आयोजन सावंतावडीत करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार शेखर सामंत यांच्या हस्ते व माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. 'सफर पुस्तकांच्या दुनियेतील' या उपक्रमात तब्बल आठ हजार पुस्तकांचा संग्रह या ठिकाणी असून १२ डिसेंबर पर्यंत भव्य प्रदर्शन व विक्री होणार आहे. 


अर्चना घारे-परब यांचा वाढदिवसानिमित्त श्री देव नारायण मंदिर हॉल, मोती तलाव समोर १ ते  १२ डिसेंबर पर्यंत भव्य पुस्तक प्रदर्शनाच आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत या प्रदर्शनचा लाभ घेता येणार आहे. शुक्रवारी घारे यांच्या वाढदिवसा निमित्त 'सफर पुस्तकांच्या दुनियेतील'या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार शेखर सामंत यांच्या हस्ते व माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाच उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांनी  प्रदर्शनाला भेट देत पुस्तकांची पहाणी केली. यानंतर कार्यक्रमाच्या सुरुवातीला अर्चना घारे-परब यांनी आपल्या प्रास्ताविकात उपक्रमा मागचा उद्देश विषद केला. त्या म्हणाल्या, १ ते १२ डिसेंबर या कालावधीत 'सफर पुस्तकांच्या दुनियेतील' या भव्य पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसापर्यंत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात ८ हजार पुस्तकांच्या २३ हजार प्रती उपलब्ध आहेत. वाचन संस्कृती जपण्यासाठी, ग्रंथ संपदा वाढविण्यासाठी हा उपक्रम आम्ही राबविला आहे. तर लहान मुलांना वैज्ञानिक खेळणी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ही मुलं भविष्यात वैज्ञानिक बनावीत यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. तर राजकारण करत असताना सामाजिक जाणीव जपणाऱ्यांना नेहमी आमच सहकार्य असत. अर्चना घारेंच सामाजिक काम हे कौतुकास पात्र आहे असं मत व्यक्त करत सामाजिक कार्यकर्ते अँड नकूल पार्सेकर यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर मालवणी कवी दादा मडकईकर, साहित्यिक प्रा. गोविंद काजरेकर, ज्येष्ठ पत्रकार शिवप्रसाद देसाई, साहित्यिका डॉ.शरयु आसोलकर यांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. 

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी शुभेच्छा देत असताना, शरद पवार यांची निवड चुकत नाही. सुप्रिया सुळे व शरद पवार यांनी अर्चना घारे-परब यांची केलेली निवड योग्य आहे. त्यांच सामाजिक कार्य राजकारणात प्रेरणा देणार आहे असं मत व्यक्त केलं. तर उद्घाटक ज्येष्ठ पत्रकार शेखर सामंत म्हणाले, राजकारणापेक्षा समाजकारणात रस असणारे राजकारणी कमी दिसतात. अर्चना घारे या त्यातील एक आहेत. लोकांमध्ये त्या असतात त्यांच्या समस्या जाणून घेतात. त्यांच्या बोलण्यातून राजकारणातून लुप्त होत चाललेला सुसंस्कृतपणा दिसतो. वाचन हे सांगून होत नाही ते रक्तात भिनाव लागत. या कार्यक्रमातून एक विचार दिसतो. समाजात वाचाल तरचं वाचाल अशी परिस्थिती आहे‌. आज सिंधुदुर्गला वाचन संस्कृती टिकवण्याची गरज असताना अर्चना घारेंनी घेतलेला उपक्रम स्तुत्य आहे असं मत व्यक्त करत घारे यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. 

याप्रसंगी उद्घाटक ज्येष्ठ पत्रकार शेखर सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, जिल्हाध्यक्ष  अमित सामंत, ज्येष्ठ पत्रकार शिवप्रसाद देसाई, साहित्यिक प्रा. गोविंद काजरेकर, साहित्यिका डॉ. शरयु आसोलकर, मालवणी कवी दादा मडकईकर, सामाजिक कार्यकर्ते अँड नकूल पार्सेकर, जिल्हा बँक संचालक आत्माराम ओटवणेकर, संदीप घारे,रेवती राणे, पुंडलिक दळवी, देवेंद्र टेमकर, पुजा दळवी, हिदायत खान, सावली पाटकर, बावतीस फर्नांडिस आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सचिन पाटकर यांनी तर आभार पुंडलिक दळवी यांनी मानले.