जुन्या पं. स. रोडवरील मोरी खचलेल्या अवस्थेत

प्रतीक बांदेकर यांनी वेधलं मुख्याधिकाऱ्यांचं लक्ष
Edited by: विनायक गावस
Published on: July 10, 2023 13:45 PM
views 136  views

सावंतवाडी : सालईवाडा जुन्या पंचायत समिती रोडवरील दाट वस्तीच्या वाॅर्डमध्ये भर पावसात नाल्यावरील मोरी खचलेल्या अवस्थेत आहे. हे रस्ते रहदारीचे असल्याने अपघात होवून जिवीतहानी होण्याची शक्यता आहे. ही खचलेली मोरी सामाजिक कार्यकर्ते प्रतीक बांदेकर यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.  या खड्यांमुळे जीवीतहानी झाल्यास होणा-या अपघातास पुर्णपणे नगरपालिका प्रशासन जबाबदार राहील असा इशारा त्यांनी दिला आहे.