केसरकरांच्या कार्यालयात तेलींची प्रेस

मनोमीलन पर्मनंट की टेंम्पररी...?
Edited by: विनायक गांवस
Published on: April 08, 2024 08:18 AM
views 455  views

सावंतवाडी : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी पत्रकार परिषद घेतली. महायुतीच्या रणनीती संदर्भात व लोकसभा उमेदवारांबाबत ही पत्रकार परिषद होती.  केसरकरांचे कट्टर विरोधक असणारे तेली यांच लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनोमीलन झाल्यान अनेकांच्या भुवया उंचावल्या. दरम्यान, आगामी विधानसभेपर्यंत केसरकर-तेलींची ही युती टिकते की लोकसभेनंतर संपते याकडे लक्ष लागून राहीलं आहे. या पत्रकार परिषदेला युवराज लखमराजे भोंसले, माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजप नेते महेश सारंग, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, राष्ट्रवादीचे काका कुडाळकर आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.