पेंडूर जिल्हा परिषद विभागात ठाकरे गटाचे पदाधिकारी जाहीर

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: August 29, 2023 20:36 PM
views 147  views

मालवण : पेंडुर जिल्हा परिषद विभागात युवासेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करताना आगामी निवडणुकीसाठी  मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात आली. कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेताना त्यांना योग्य त्या सूचना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिल्या.


कट्टा बाजारपेठ येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज, युवासेना समन्वयक मंदार ओरासकर, युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, अक्षय रेवंडकर, महिला विभागप्रमुख लता खोत,  विभागप्रमुख कमलाकर गावडे, उपविभागप्रमुख उमेश प्रभू आणि शिशुपाल राणे, दर्शन म्हाडगुत, बाबू टबुलकर, वंदेश ढोलम, देवदास रेवडेकर, शेखर रेवडेकर, संदीप सावंत, गणेश गाड, हर्षद मोरजकर, जगदीश मोरजकर , राजु परब, प्रसाद दळवी, बाळा पेडणेकर, किशोर भगत, विजय धामापुरकर, भिवा तळगावकर यांसह विभागातील सर्व शाखाप्रमुख आणि शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते


यावेळी सर्वांच्या एकमताने युवासेना पेंडुर विभागप्रमुख पदी वंदेश ढोलम, शिवसेना कट्टा शाखाप्रमुख पदी गणेश गाड , उपशाखाप्रमुख पदी हर्षद मोरजकर, शिवसेना काळसे शाखाप्रमुख पदी चंद्रकांत उर्फ पप्या राऊळ युवासेना कट्टा शाखाप्रमुख पदी भूषण ढोलम, सिद्धार्थ हिरवे , युवासेना पेंडूर शाखाप्रमुख पदी संदीप सावंत यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.