देवगड व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली तहसीलदारांची भेट...!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 04, 2023 11:03 AM
views 90  views

देवगड : तालुका तहसीलदार पदी रमेश पवार आणि महावितरण देवगड विभागाच्या सहाय्यक अभियंता शिल्पा माने यांनी पदभार स्वीकारल्यानंतर देवगड तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तालुका अध्यक्ष शैलेश कदम, महिला अध्यक्ष प्रियांका साळसकर, वीज ग्राहक संघटना अध्यक्ष दिनेश पटेल, पर्यटन समिती सदस्य दिग्विजय कोळंबकर, शामनाथ बांदकर, शहराध्यक्ष दयाळ गावकर, दया पाटील, रवींद्र जोगल आदी व्यापारी उपस्थित होते.