पालकमंत्र्यांच्या आदेशाकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

माजी आमदार परशुराम उपरकर यांची टीका
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: August 23, 2025 17:11 PM
views 128  views

कणकवली : पालकमंत्री नितेश राणेंच्या आदेशाकडे जिल्ह्यातील सरकारी अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. तर पालकमंत्र्यांची देखील केवळ घोषणाबाजी सुरू आहे. त्यामुळे नितेश राणेंनी पालक मंत्री पदाचा राजीनामा द्यावा व राणी यांच्या ऐवजी दुसऱ्या पालकमंत्र्याची नेमणूक करावी अशी मागणी विरोधी पक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे. नितेश राणे यांनी मटक्याच्या अड्डयावर धाड टाकली त्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो. मात्र, या कारवाईसाठी नऊ महिने का लागले,‌ असा सवाल शिवसेना उबाठा पक्षाचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला.

येथील संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना श्री. उपरकर म्हणाले,  नितेश राणे यांनी पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी जिल्ह््यातील अवैध धंद्यांचे नेटवर्क मोडून काढणार अशी घोषणा केली होती. ९ महिन्यांच्या कालावधीत अवैध धंदे बंद करण्यात मंत्री राणे यांना अपयश आले आहे. प्रशासकीय बैठकांमध्ये मंत्री राणे यांनी अधिकाºयांना अवैध धंदे व अनधिकृत वाळू उपसा करणाºयांवर कारवाई आदेश दिले. मात्र, अद्यापही अवैध धंदे व वाळू उपसा राजरोजपणे सुरू आहे. त्यामुळे अधिकारी हे पालकमंत्र्यांचे आदेशाकडे दुर्लक्ष करतात, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे अवैध धंदे व अनधिकृत वाळू उपसा करणाºयांना अभय मिळत आहे, असा आरोप उपरकर यांनी केला. 

सिंधुदुर्ग अमलीपदार्थ विक्री राजरोजपणे होत आहे. अमलीपदार्थ सहजरित्या युवा पिढीला उपलब्ध होत असल्याने गांजा, चरस यासारख्या अमलीपदार्थांच्या आहारी युवा पिढी गेली आहे. त्यामुळे अमलीपदार्थांच्या विक्रीला ब्रेक लावण्याबाबत पालकमंत्र्यांची भूमिका काय आहे, हे त्यांनी जाहीर करावे. तर अवैध धंदे व वाळू उपसा करणाºयांमध्ये सत्ताधारी पक्षांतील मंडळी आहेत. त्यावर कारवाई करण्याचे धारिष्ट पालकमंत्री दाखवणार आहेत का ? असा सवाल उपरकर यांनी केला.‌नऊ महिन्यांच्या कालावधीतनंतर अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पालकमंत्र्यांना स्वत: धाड टाकावी लागते, असे त्यांचे अपयश आहे, असा टोला उपरकर यांनी लगावला.

राजापूर तालुक्यातील सूर्यमंदिराबाबत एका समाजाने विरोधाची भूमिका घेतल्याने हिंदुंनी सभेचे आयोजन केले होते. या सभेला पालकमंत्री नितेश राणे हे जाणार होते. रत्नागिरीच्या सीमेवर पालकमंत्र्यांना नेण्यासाठी एक्स स्कॉड आले होते. ही बाब रत्नागिरीच्या पालकमंत्र्यांना कळली. त्यांनतर त्यांनी याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मंत्री राणे दम दिला. त्यामुळे राणेंनी सभेला जाणे टाळले, असेही उपरकर म्हणाले.