LIVE UPDATES

महसूल दिनानिमित्त वैभववाडीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 01, 2026 19:12 PM
views 21  views

वैभववाडी : महसूल विभागात उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल वैभववाडी तहसील कार्यालयातील तहसीलदार सूर्यकांत पाटील, महसूल सहायक महादेव बाबर आणि महसूल सेवक सुरेंद्र पेडणेकर यांचा महसूल दिनानिमित्त जिल्हास्तरावर सन्मान करण्यात आला. पालकमंत्री नितेश राणे व जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते या तिघांनाही  सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. 

 महसूल विभागामार्फत दरवर्षी महसूल दिनानिमित्त जिल्ह्यात उल्लेखनीय व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येतो. यावर्षीच्या याकरिता वैभववाडी तहसीलदार व  आणि दोन कर्मचाऱ्यांची निवड झाली होती.आज जिल्हाधिकारी कार्यालयात या तिघांचाही सन्मान करण्यात आला. तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी महसूल प्रशासन अधिक सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. तसेच महसूल सहायक महादेव बाबर आणि महसूल सेवक सुरेंद्र पेडणेकर यांनी कार्यालयीन कामकाजात दाखविलेली तत्परता, प्रामाणिक सेवा आणि उल्लेखनीय योगदान याचीही दखल घेण्यात आली.या सन्मानानंतर या तिघांचेही सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.