घारेंबाबत आक्षेपार्ह कमेंट

अब्रु नुकसानीचा दावा दाखल
Edited by:
Published on: November 25, 2024 13:29 PM
views 833  views

सावंतवाडी : सोशल मीडियावर एका व्यक्तीकडून निवडणूकीत पैसे घेऊन मॅंनेज झाल्याची आक्षेपार्ह कमेंट केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब चांगल्याच आक्रमक झाल्या. सावंतवाडी पोलिस ठाण्यात त्यांनी संबंधिताविरोधात तक्रार दाखल केली. महिला आयोगाचही त्यांनी लक्ष वेधलं. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी घारेनी केली. 

घारे म्हणाल्या, अनंत मांजरेकर नामक व्यक्तीने पाच करोड मिळाले तेवढे बास झाले अशी बदनामीकारक कमेंट केली. निवडणूक काळात मॅनेज होऊन उभ्या राहील्या अशा अफवा उठल्या गेल्या. आज अशा कमेंट येऊ लागल्याने पोलिसांसह महिला आयोगाच लक्ष वेधलं.‌ संबंधितांवर अब्रु नुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. राजकारणात प्रामाणिकपणे येणाऱ्या व काम करणाऱ्या महिलांवर अशा कमेंट होत असतील तर ते खपवून घेणार नाही. माझ्यासह कार्यकर्त्यांनी प्रामाणिक काम करत स्वाभिमान जपला. त्यामुळे विनाकारण खोटे आरोप कोणीही करू नये. पैसे घेतले असे आरोप करण्याऱ्यांनी हिंमत असेल तर समोर यावं व पुरावा द्यावा असे आव्हान त्यांनी दिले. चुकीच बोलणाऱ्यांवर कारवाई होणार, चुकीच्या गोष्टी खपवून घेणार नाही असा इशारा दिला. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघान आमचा प्रामाणिकपणा पाहिला आहे. पण, या गोष्टी बघून खोट्या अफवांमुळे मनाला प्रचंड वेदना झाल्याचही त्यांनी म्हटले. मी सगळ्यांना डोहीजड झाले होते. महिला प्रामाणिकपणे, स्वाभिमानान लढते याची भिती विरोधकांना होती‌. त्यामुळे अफवा पसरवल्या, निलंबनाचा शेवटच्या दिवसापर्यंत प्रयत्न केला. पदाधिकारी कार्यकर्ते फोडण्याच, आमिष देण्याच व महिलांना धमकावल गेलं. ही लढाई सत्याच्या मार्गानं लढण आवश्यक होतं. चुकीच राजकारण सावंतवाडीला पटणार नाही असं अर्चना घारे-परब यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, हिदायत खान, ऋतिक परब, पुजा दळवी आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.