
मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत खांदेपालट करण्यात आले आहेत. जिल्हयातील तीन विधानसभा मतदारसंघात तीन जिल्हा प्रमुख असणार आहेत. आज मातोश्रीवर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. कणकवली विधानसभा सतिश सावंत, कुडाळ मालवण संजय पडते, सावंतवाडी संदेश पारकर यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून अतुल रावराणे यांची निवड करण्यात आली आहे.