आता कणकवली शहरातील कचरा संकलन करणे सोपे होणार...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: June 11, 2023 15:22 PM
views 96  views

कणकवली : शहरातील कचरा संकलन करण्याची सुविधा अजून मजबूत होण्याच्या दृष्टीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासदार निधीतून 25 लाखांचा निधी कणकवली नगरपंचायतच्या कचरा संकलन वाहना करीता देण्यात आला होता. यामधून दोन घंटागाड्या व एक ट्रॅक्टर खरेदी करण्यात आला आहे. माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी याकरिता पाठपुरावा केला होता. माजी नगराध्यक्ष  नलावडे व माजी उपनगराध्यक्ष  हर्णे यांच्या मागणीनुसार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हा 25 लाख रुपयांचा निधी दिला होता.

दोन कायझन घंटागाड्या उपलब्ध झाल्या असून येत्या दोन दिवसात ट्रॅक्टर देखील उपलब्ध होणार असल्याची माहिती  नलावडे यांनी दिली. यामुळे कणकवली शहरातील कचरा संकलन करणे अजून सोपे जाणार आहे. नारायण राणे यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नलावडे व  हर्णे यांनी त्यांचे आभार मानले आहेत.