कणकवलीत : आमदार नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व भास्कर जाधव यांच्याबद्दल असंसदीय शब्दात टीका केली. त्यांच्या विरोधात तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा. शिवसेना उपनेते आ. भास्कर जाधव पुन्हा आल्यास करेक्ट कार्यक्रम करू,असा इशारा देणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवावं, भास्कर जाधव यांच्या उपस्थित कणकवलीचा शिवसेनेचा मेळावा होईल, आम्ही त्यांना पुन्हा आणून परफेक्ट कार्यक्रम करून दाखवू. जनता जिल्ह्यात आ.नितेश राणे यांना फिरु देणार नाही, असा इशारा शिवसेना नेते सतीश सावंत यांनी दिला आहे.
कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देत आ.नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. भास्कर जाधव यांचा पुतळा जाळत कोण धमकी देत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. आमदार नितेश राणेंवर गुन्हा केला दाखल केव्हा करणार?ज्या पद्धतीने आ.भास्कर जाधव यांच्या वर गुन्हा तातडीने दाखल केला .त्या पद्धतीने तातडीने गुन्हे दाखल करावेत,सरकार आले म्हणून कायदा हातात घेऊ शकत नाही. कारवाई झालीच पाहिजे,अशी मागणी सुशांत नाईक,कन्हैया पारकर यांनी केली.
याबाबत उपजिल्हा प्रमुख राजू शेट्ये यांनी नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत,युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडी अध्यक्ष निलम पालव सावंत, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये,तालुकाप्रमुख शैलेश भोगले, राजू राठोड,नगरसेवक कन्हैया पारकर,उत्तम लोके,विलास गुडेकर, सचिन आचरेकर,रुपेश आमडोस्कर,वैद्यही गुडेकर,धनश्री मेस्त्री, बंडू ठाकुर,महेंद्र डिचोलकर, वैभव मालांडकर,निसार शेख,रिमेश चव्हाण,सिद्धेश राणे,तात्या निकम आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते