'त्या' व्यापाऱ्यांना स्थलांतरित होण्याच्या नोटिसा..!

Edited by: भरत केसरकर
Published on: August 24, 2023 11:38 AM
views 524  views

सावंतवाडी : सावंतवाडी मुख्य बाजारपेठेतील संत गाडगेबाबा मंडईच्या नवीन इमारतीचे काम येत्या आठवड्यात हाती घेण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या मंडळीतील फुल,भाजी व अन्य व्यापारी अशा जवळपास ६५ ते ७० व्यापाऱ्यांना २४ ऑगस्ट पासून नव्या जागी स्थलांतरित होण्याच्या सुचना पालिका प्रशासनाने दिल्य आहेत. मंडईतील वीज पुरवठा बुधवारी खंडित करण्यात आला. त्यामुळे आता मंडईतीला भाजी व फळ विक्रेत्यांना पत्राच्या शेड मध्ये स्थलांतरित व्हावे लागणार आहे.

या मंडईच्या कामाचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणी शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते जूनच्या पहिल्या आठवड्यात झाले होते. आता या कामाचा शुभारंभ होणार असून जलदगतीने काम सुरू होणार आहे. पावसाळ्यानंतर जलदगतीने बांधकाम सुरू होणार आहे.गेल्या महिन्याभरापासून दोन व तीन वेळा पालिकेने स्थलांतरित होण्याच्या सूचना पालिका प्रशासनाने दिलेल्या होत्या.

परंतु व्यापाऱ्यांनी दोन ते तीन वेळा मुदत वाढ घेतली. आता पालिका प्रशासनाने कुठल्याही परिस्थितीत 24 ऑगस्ट पासून स्थलांतरित होण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. गणेश चतुर्थी अवघ्या पंधरा दिवसात आली. त्यामुळे स्थलांतर पुढे ढकला अशी मागण व्यापाऱ्यांची आहे. पत्र्याच्या शेडमध्ये धंदा होईल का? अशी शंका त्यांना भेडसावत आहे. पालिका प्रशासनाने सायंकाळी उशिरा येथील विक्रेत्यांना गुरुवारपासून स्थलांतरित होण्याच्या सूचना दिलेल्य  आहेत.  स्वतः मुख्याधिकारी सागर साळुंखे व त्याच्या सहकाऱ्यांनी व्यापाऱ्यांची भेट घेऊन नव्या जागेत स्थलांतरित होण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच मंडईतील  वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.