
सावंतवाडी : जिमखाना मित्र ग्रुप सावंतवाडी यांच्यावतीने जिल्हा परिषद शाळा क्र. १ येथील विद्यार्थ्यांसाठी मोफत वही वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व्हावी आणि त्यांचा हक्काचा शिक्षणाचा प्रवास अधिक सुखकर व्हावा, या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला.
या उपक्रमावेळी ग्रुपचे अध्यक्ष अजित सांगेलकर, सदस्य म्युजिब शेख, उपाध्यक्ष इम्रान शेख, सल्लागार ॲड. राजू कासकर आणि सामाजिक कार्यकर्ते मिलिंद देसाई हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेतील शिक्षकांनी या सामाजिक उपक्रमाचे स्वागत करत जिमखाना मित्र ग्रुपचे आभार मानले. अशा उपक्रमांमुळे समाजात शिक्षणाविषयी जागरूकता वाढत असल्याचे पालकांनीही सांगितले.










