
दोडामार्ग : तालुक्यातील केर - मोर्ले - घोटगेवाडी या गावात गेल्या ४ दिवसांपासून नेटवर्क नसल्याने हे गाव नॉटरिचेबल आहेत. तालुका ठिकाण असून इथे बीएसएनएलचे कार्यालयच नाही. सावंतवाडी येथे अधिकाऱ्यांना संपर्क केल्यास त्यांना फोन लागत नाही. त्यामुळे तिन्ही गावातून संताप व्यक्त होत आहे.
जर प्रशासनाला नेटवर्क सेवा देता येत नसेल तर हे गाव ऑफलाईन जाहिर करून ऑनलाईनची अट शिथिल करावी आणि रेशन धान्य, शासनस्तरावरील कामात सूट द्यावी अशी मागणी होत आहे.