
शक्तीपीठ महामार्ग विरोधात सभा
सावंतवाडी : शेतकरी संघटना तुमच्या सोबत आहे. त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध करू, गावागावात जाऊन जागृती करू असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा केसरकर म्हणाले. तसेच आमच्यामागे कोणी इडी लावू शकत नाही. त्यातले कोणी व्यासपीठावर उपस्थित नाही. त्यामुळे वेळ पडली तर जेलभरो आंदोलन करू असा इशारा अण्णा केसरकर यांनी दिला.
शक्तीपीठ महामार्गा विरोधात आयोजित सावंतवाडी येथील सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे, कॉ संपत देसाई, कॉग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा केसरकर, उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर, प्रसाद पावसकर, रूपेश राऊळ आदी उपस्थित होते.