विरोधकांनी कितीही अपप्रचार केला तरी भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलचेच सर्व उमेदवार निवडून येणार- राजन कोरगावकर

Edited by: देवयानी वरसकर
Published on: May 12, 2023 14:57 PM
views 114  views


सिंधुदुर्गनगरी 

   सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी निवडणूक 14 मे रोजी होणार असून निवडणूक प्रचार जोरात सुरू आहे.विरोधकांनी कितीही खालच्या पातळीवर जाऊन अपप्रचार केला तरीही गेली 22 वर्षे पारदर्शक व सभासदाभिमुख पतपेढीचा कारभार करून सभासदांमध्ये विश्वास निर्माण करणा-या भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेल च्या सर्व 15 ही जागा निवडून येणार आणि विरोधकांचा पराभवाने सुपडा साफ होणार अशी प्रतिक्रीया भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलचे प्रमुख श्री राजन कोरगावकर यांनी प्रसिध्दीपत्रकाने दिली आहे.

     भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेल व प्राथमिक शिक्षक समितीने गेली अनेक वर्ष सातत्यपूर्ण शिक्षकांच्या विविध ज्वलंत प्रश्नांना न्याय देण्यासाठी आंदोलने, मोर्चा, निदर्शने, संप अशी लोकशाहीतील विविध आयुधे वापरून सतत कार्यरत आहे.ज्यांना शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत कोणतेही देणेघेणे नाही,कोणतेही आंदोलन, मोर्चा, संप करायचा नाही आणि फक्त स्वार्थासाठी पाच वर्षांनी पतपेढी निवडणूक जाहिर झाली की प्रसिद्धीचा भपका करत सर्वसामान्य शिक्षकांची दिशाभूल करायची यामुळेच विरोधकांकडे कोणतेही ठोस प्रचाराचे मुद्दे नसल्याने पातळीसोडून वैयक्तिक टिका, अपप्रचार करीत आहेत.

    परंतू प्राथमिक शिक्षक हे सुज्ञ मतदार आहेत ते या अपप्रचार व भूलथांपांना बळी पडणार नसून 14 मे रोजी पाटी या निवडणूक चिन्हावर मतदान करून भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेल च्या सर्व 15 ही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून देवून विरोधकांचा सुपडा साफ करून परिवर्तन करतील. असा घणाघात श्री राजन कोरगावकर यांनी केला आहे.

    ऑडीट फी बाबत विरोधकांकडून केली जाणारी दिशाभूल-

  दि 29 ऑक्टोबर 2014 च्या सहकारक्षेत्रातील शासन निर्णयातील सिरियल नमुना 34 प्रमाणेच ऑडीटरना फी अदा केलेली आहे.सन 1991-92 च्या आदेशानुसार सदरची ऑडीट फी तिप्पट होती परंतू 29 ऑक्टोबर 2014 च्या शासन निर्णयानुसार सदर ऑडीट फी दर कमी करण्यात आलेले आहे. पतपेढीच्या संचालक मंडळाच्या एकमताने व वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मंजूरीने सदर ऑडीट फी देण्यात आलेली आहे.याचा अभ्यास न करताच विरोधक चूकीच्या पध्दतीने पतपेढी ऑडीट फी बाबत गैरसमज पसरवत आहेत.

     वैभववाडी शाखा नूतन वास्तू खरेदीबाबत निर्णय योग्यच-

  वैभववाडी शाखा जूनी वास्तू खरेदी करताना तत्कालीन विरोधी संचालक मंडळाने चुकीची जागा खरेदी करत सदर जागेचे सर्व कागदपत्रांमध्ये अनेक त्रुटी होत्या.सदर जागेत शिक्षक सभासदांना येणेजाणे व पार्किंगची गैरसोय व अन्य सोयीसुविधांचा अभाव असल्याने वैभववाडी तालुक्यातील मालक सभासदांनी मागणी केल्याने व वैभवावाडी तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना यांच्या संमत्तीनेच सुसज्ज अशी नूतन जागा विद्यमान संचालक मंडळाच्या कारकिर्दीत कमीत कमी किमतीत प्रशस्त वास्तू खरेदी केलेली असून संस्थेच्या स्थावर मालमत्तेत वाढ झालेली आहे.याबाबत विरोधकांनीच वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाचा अभिनंदन ठराव पारित केलेला आहे.याची इतिवृत्तात नोंद असताना या निवडणूकीत विरोधी पॅनेलला पराभव दिसत असल्याने खोडसाळ व अपु-या माहितीच्या आधारावर बेताल वक्तव्य करून मतदारांची दिशाभूल करत आहेत.

   पतपेढी अध्यक्षपदावरून गलिच्छ राजकारण

 सोशल मिडियावर   पतपेढी अध्यक्ष पदाच्या कालावधीबाबत व घेतलेल्या निर्णयाबाबत चुकीच्या पध्दतीने मतदार शिक्षकांची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे.वास्तविक सर्व धोरणात्मक निर्णय हे सहकार कायदा व संचालक मंडळ व सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनेच केले जातात.ही बाब ज्यांना समजत नाही ते विरोधी उमेदवार काय परिवर्तन करणार हा सर्वसाधारण सुज्ञ मतदारांना प्रश्न पडला आहे.

    आंतरजिल्हा बदली व कार्यमुक्तिबाबत फुकटचे श्रेय घेण्याचा विरोधकांचा केविलवाणा प्रयत्न

  रखडलेल्या बदली व कार्यमुक्तिबाबत तालुका, जिल्हा व मंत्रालय स्तरावर सातत्यपूर्ण प्राथमिक शिक्षक समितीने यशस्वी पाठपुरावा करत वेळ प्रसंगी मान उच्च न्यायालयात याचिका दाखल करून संबंधितांना न्याय मिळवून देत दि 30 एप्रिल 2023 अखेर सर्व आंतरजिल्हाबदली शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचा शासनाला शासन निर्णय निर्गमित करावा लागला व संबधितांना दि 2 मे रोजी एकाचवेळी कार्यमुक्त करण्यात आले.या संपूर्ण प्रक्रियेत शिक्षक समितीने कोणत्याही बदलीधारक शिक्षकांकडून कोणताही आर्थिक व्यवहार न करता निस्वार्थीपणे काम केलेले असताना ज्या विरोधकांनी संबंधित शिक्षकांना दोन ते तीनवेळा आर्थिक भुर्दंड देत कोणतेही प्रयत्न केले नाहित त्यांनी या प्रश्नाबाबत गलिच्छ राजकारण करू नये.याबाबत सुज्ञ मतदारांना वास्तव काय हे माहित आहे.

    पुढील 5 वर्षापेक्षा कमी कालावधीत सेवानिवृत्त होणारे विरोधी पॅनेलचे उमेदवार

  या निवडणूकीत विरोधी पॅनेलने उभे केलेले मालवण व सावंतवाडी तालुका सर्वसाधारण क्षेत्र उमेदवार यांची सेवा फक्त 4 व 3 वर्षे शिल्लक राहिलेली असताना या उमेदवारांना निवडणूकीत उतरवून पूर्ण 5 वर्षे कालावधी पूर्ण करू शकणारा अन्य उमेदवार नाही हेच सिद्ध केले आहे.अशा उमेदवारांना मतदार त्यांची योग्य जागा दाखवून देतील.

   विरोधी पॅनेलच्या युतीवरूनच कार्यकर्ते व पदाधिकारी नाराज

सत्ताधारी पॅनेलच्या उत्तम कामगिरीमुळे दिशाहिन व ताळमेळ अभाव असलेले विरोधी पॅनेलमधील सहभागी एका संघटनेवर त्याच पॅनेलमधील अन्य संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी नाराज असल्याने नाईलाजास्तव प्रचार करत असल्याची भावना खाजगीत व्यक्त करित आहेत.गेल्या दोन वर्षांपासून ज्या एका संघटनेने शिक्षकांना खोटी आश्वासने देऊन इतर संघटनेतील काही शिक्षकांचे संघटना प्रवेश करून फोडाफोडीचे राजकारण केले याच संघटनेला पॅनेलमध्ये प्रवेश दिल्याने दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यात विरोधी पॅनेलमध्येच बंडखोरी झाली.त्यामुळे विरोधी पॅनेलमधील उमेदवार व पदाधिकारी यांच्यामध्ये ताळमेळ राहिलेला नाही.त्यामुळेच विरोधी पॅनेलमधील उमेदवारांकडून एकच मत द्या असा केविलवाणा प्रचार करण्याची वेळ आली आहे.

     विरोधकांकडून कर्जवाढ व व्याजदराबाबत संभ्रम निर्माण करणे

 पतसंस्थेच्या सभासदांचा विचार करताना कर्जदार/ठेवीदार/भागधारक या तिघांनाही फायदा होईल अशाप्रकारचे धेयधोरण आखून पतपेढीचे कामकाज केले तरच संस्था स्थिर व प्रगतीपथावर राहते.हे वास्तव असताना केवळ मतांच्या राजकरणासाठी कर्जाचे व्याजदर अवास्तव कमी करणे, भरमसाठ कर्जयोजना आखणे, आर्थिक निर्बंधांचा विचार न करणे हे पतपेढीच्या मूळीच हिताचे नाही.ठेवी-कर्ज-निधी-भागभांडवल-तरलता अशा अनेक बाबींचा साकल्याने विचार करून सभासद हिताचे निर्णय घ्यावे लागतात आणि तसे निर्णय गेल्या 22 वर्षात भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलने घेतलेले आहेत.याबाबत विरोधकांकडून शिक्षक मतदारांची दिशाभूल केल्यामुळे सुज्ञ मतदार मतदानातून विरोधकांना त्यांची जागा दाखवून देतील हा विश्वास आम्हाला आहे असे श्री राजन कोरगावकर यांनी स्पष्ट केले.

     भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेल च्या सर्व 15 ही जागा प्रचंड मताधिक्याने रेकॉर्ड ब्रेक विजयी होणार असा विश्वास आम्हाला आहे असे भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेल प्रमुख श्री राजन कोरगावकर यांनी स्पष्ट करत भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेल च्या सर्व उमेदवारांना पाटी या चिन्हावरच मतदान करून विजयी करावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक मतदार बंधुभगिनीनां  केले आहे.