
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीची धामधुम जोर धरू लागली आहे. आज तिसऱ्या दिवशी कणकवली नगरपंचायतीसाठी एकही अर्ज अजून दाखल झाला नाही.रविवार हा सुट्टीचा वार असल्याने अवघे चार दिवस हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता शिल्लक राहिले आहेत. पक्षीय उमेदवाराला एक तर अपक्ष उमेदवाराला पाच सूचकांची नावे लागणार आहेत. त्यामुळे पुढील चार दिवसात उमेदवारांची उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाऊ गर्दी होण्याची शक्यता आहे.
कणकवली शहरात महायुती होणार की नाही त्याबद्दल कोणतीही निर्णय झाला नाही तसेच महाविकास आघाडी मध्ये देखील चढाओढ पाहायला मिळत आहे. काही उमेदवारांना पक्षाकडून एबी फॉर्म न मिळाल्यास अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची देखील तयारी केली आहे. त्यामुळे कणकवलीत 17 प्रभागासाठी पुढील 4 दिवसात 70 पेक्षा जास्त उमेदवार अर्ज दाखल होण्याची शक्यता असल्याने सर्वच उमेदवारांचे तहसील कार्यालयात भाऊ गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे











