दोडामार्ग नवरात्र उत्सव मंडळ अध्यक्षपदी नितीन मणेरीकर ; सचिवपदी आनंद कामत

उपाध्यक्षपदी प्रमोद परमेकर ; खजिनदारपदी विशाल मणेरीकर
Edited by: संदीप देसाई
Published on: October 04, 2023 18:07 PM
views 159  views

दोडामार्ग : दोडामार्ग शहरातील सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ बाजारपेठची यंदाची  कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी नितीन मणेरीकर तर सचिवपदी आनंद कामत यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी प्रमोद परमेकर व खजिनदारपदी विशाल मणेरीकर यांचीही निवड करण्यात आली आहे.

येथील बाजारपेठेतील गणेशोत्सव मंडळ स्थापन झाल्यानंतरच्या काही वर्षांनी मंडळामार्फत नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली. येथे गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्र उत्सवात सुद्धा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. फुगडी स्पर्धा, फॅन्सी ड्रेस, दांडिया स्पर्धा, ऑर्केस्ट्रा, स्टेज शो, महिलांसाठी विविध स्पर्धात्मक कार्यक्रम, घुमट आरती , कुंकूमार्चन,  खेळ पैठणीचा आदींचे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन या नवरात्र उत्सवात पहावयास मिळतात. तर दोडामार्ग सोबत नजीकच्या गोव्यातीलही अनेक कलावंत या नवरात्र उत्सवात कार्यक्रमांच्या निमित्ताने सहभागी होत असतात. त्यामुळे यावर्षीचा हा उत्सव मोठ्या धूम धडाक्यात व उत्साहात सपन्न होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर नूतन नवरात्र उत्सव समिती जाहीर करण्यात आली आहे.ती पुढील प्रमाणे - नितीन मणेरीकर (अध्यक्ष ), आनंद कामत (सचिव ), प्रमोद परमेकर (उपाध्यक्ष ), विशाल  मणेरीकर (खजिनदार. ), सदस्य-सागर चांदेलकर,  विलास मिरकर, प्रवीण आरोंदेकर, रजत राणे, पंकज मणेरीकर, आशीर्वाद मणेरीकर व सुमंत मणेरीकर आदि असणार आहेत.