NCP शरदचंद्र पवार पक्षाच्या सावंतवाडी विधानसभा महिलाध्यक्षपदी नितेशा नाईक

Edited by: विनायक गावस
Published on: March 26, 2024 07:21 AM
views 150  views

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संमतीने सावंतवाडी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सावंतवाडी विधानसभा महिलाध्यक्षपदी नितेशा नाईक यांची नियुक्ती करण्यात आली. याच नियुक्तीपत्र कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या हस्ते नितेशा नाईक यांना देण्यात आल. पक्ष संघटन व वाढीसाठी तसेच जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी नितेशा नाईक नक्कीच जोमाने काम करतील असा विश्वास व्यक्त करत अर्चना घारेंनी त्यांचे अभिनंदन आणि पुढील सामाजिक व राजकीय वाटचालिसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे, शहराध्यक्ष अँड सायली दुभाषी आदी उपस्थित होते.