शरद पवार गटाला नितेश राणेंचा धक्का !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 28, 2023 18:56 PM
views 138  views

देवगड : लिंगडाळचे माजी सरपंच व राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे कार्यकर्ते दशरथ शंकर लोके यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये आज लिंगडाळ येथे प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी दिया लोके यांच्यासह लिंगडाळमधील अनेक कार्यकर्ते व नागरिकांनी यावेळी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यावेळी तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर तसेच देवगड अर्बन बँकेचे चेअरमन सदा ओगले यांच्यासह जिल्हा सरचिटणीस संदीप साटम व अनेक भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

यापक्ष प्रवेशामुळे देवगड तालुक्यामध्ये राष्ट्रवादीला दणका बसल्याचे चित्र दिसत आहे. दशरथ लोके यांच्या समवेत चंद्रकांत धोंडू सावंत, रमेश अर्जुन गायकवाड, अनंत रघुनाथ सावंत, सखाराम आत्माराम सावंत, विष्णू काशीराम परब, स्वप्निल बाळा तेली, संदीप वसंत लोके, मारुती लक्ष्मण धुवाळी, नवनीत आत्माराम मुंबरकर, मनीषा मारुती गायकवाड, कल्याणी भिकाजी आईर, सायली संदीप लोके, नीता मोंडे, अशोक तुकाराम मुबरकर, मोहन मुंबरकर पंडित लोके, सुरेश डोंगरेकर, चंद्रकांत नाटेकर, चंद्रकांत घाडी प्रभाकर बावकर, गुरुनाथ तेली, अर्जुन अहिर, विजय सावंत, शुभांगी मुंबरकर, सिताराम लोके, सत्यवान राऊतयाच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या सर्वांनीच आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे.