
सिंधुदुर्गनगरी : आमदार नितेश राणे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत असून, कणकवली येथील गांगो मंदिर येथे नारळ ठेवून अर्ज भरण्यांच्या र्यालीला सुरू होणार आहे. अर्ज भरण्यासाठी नितेश राणे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी सुरू केली असून, काही वेळातच ही रॅली सुरू होणार आहे. या रॅलीने नितेश राणे हे कणकवली तहसीलदार कार्यालय येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, त्यानंतर उप जिल्हा रुग्णालय कणकवली समोरील मैदानात ही जाहीर सभा होणार आहे. यावेळी माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे हे उपस्थितराहणार आहेत.