
सावंतवाडी : कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे. नितेश राणे यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक विकासकामांना गती मिळणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील अनेक रखडलेली कामे मार्गी लागतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या सावंतवाडी महिला तालुकाध्यक्षा रिद्धी रोहन परब यांनी व्यक्त केलाय.
आमदार नितेश राणे यांनी मागील दहा वर्षात आमदार असताना त्यांच्या मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारे आमदार अशी त्यांची ओळख आहे. नितेश राणेंच्या मंत्रीपदानें सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासकामांच्या नव्या पर्वाला सुरुवात होईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा रिद्धी परब यांनी दिली आहे.