हरकुळ बुद्रुक नुकसानग्रस्तांना नितेश राणेंची मदत

नुकसान ग्रस्त कुटुंबांना सिमेंट पत्रे आणि छताची कैले केली घरपोच
Edited by: उमेश बुचडे
Published on: May 17, 2024 13:42 PM
views 444  views

कणकवली : कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथील शेखवाडी व खडक वाडी येथे वादळी वाऱ्यात नुकसान झालेल्या कुटुंबियांच्या मदतीसाठी भाजप आमदार नितेश राणे धावून गेले. या ठिकाणच्या पंधरा ते वीस घरांचे नुकसान या वादळी वाऱ्यात झालेले होते.

घरांचे छत, छताचे पत्रे, कैले वाऱ्याने उडून गेली होती.तर काहींच्या घरावर झाडे पडून नुकसान झाले होते. या सर्वांना मदतीचा हात म्हणून सिमेंट पत्रे आणि छताची कैले आमदार नितेश राणे यांनी तातडीने घर पोच केली. यावेळी भाजपचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.