
कणकवली : जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक एकतर्फी होत चालली आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांना मतदान का करावं असा प्रश्न सर्वांना पडला आहे. ही निवडणूक खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वात लढवत आहोत. गेली २७ वर्ष जिल्हा परिषद खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली आहे आणि पुढे पाच वर्षे राहील. उबाठाची चिंता आम्हाला नाही. जे उमेदवार उरले आहेत ते प्रचार करताना दिसत नाही. काहीजण प्रचार करताना लपत आहेत. त्यामुळे निवडणूक निकालानंतर परत पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्याकडे निधीसाठी जावं लागणार आहे. जिल्हयाचा विकास खासदार नारायण राणे आणि महायुतीच करू शकते. असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

जिल्हा परिषद फोंडाघाट आणि पंचायत समिती लोरे ची घोणसरी व फोंडाघाट येथे महायुतीची सभा संपन्न झाली.यावेळी आम. रवींद्र फाटक, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, संतोष कानडे,दिलीप तळेकर,सदानंद हळदीवे, मानसी मराठे, पवन भालेकर मनोज रावराणे, तालुकाप्रमुख दामू सावंत, माजी सरपंच राजू रावराणे, अजय रावराणे, सुजाता हळदीवे, आदी उपस्थित होते.
फोंडा मतदार संघ शिवसेने मागितली. १९९० पासून मामा हळदीवे खासदार नारायण राणे यांच्या सोबत आहेत. आईंच्या आदेशानुसार उमेदवार हे मामा हळदिवे आहेत. दिवसरात्र सतत संपर्कात राहणारे राणे साहेबांचे सचे कार्यकर्ते म्हणजे मामा हळदिवे आहेत. फोंडा मतदार संघात निधी मी कमी पडायला देणार नाही.
केंद्रात, राज्यात सगळीकडे महायुतीच्या विचाराचे नेते आहेत. पुढील निवडणूक झाली की कोणताही प्रश्नच राहत नाही. अनुभवी लोक या मतदारसंघात आहेत. जनतेच्या आशीर्वादाची गरज आहे. राणे कधी डबल करत नाही, जिथे असतात तिथे शंभर टक्के असतात. कोणीही काहीही येऊन सांगेल, जिथे कमळ तिथे आम्ही हे लक्षात ठेवा.
राष्ट्रवादी काँग्रेस चा तो उमेदवार. कसा दिसतो. तो निवडणूक झाली की सहा महिने व बाहेर राहणार नाही. लोकांच्या विरोधात असणारे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. तडीपार चे सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आपल्या हक्काच्या आमदार, पालकमंत्री चा शब्द राखण्याच काम तुम्ही करायचं आहे. तुमचा आमदार पालकमंत्री आहे. आता कोणतीही चिंता करायची गरज नाही. संजय आंग्रे आता मनापासून आहेत. या मतदारसंघात चांगली लीड असणारा मतदार संघ असला पाहिजे. मला या मतदारसंघात एक नंबर चे लीड द्या पहिला १ कोटींची निधी देतो. राजन चिके काहीही बोलतील तिकडे लक्ष देऊ नका. खासदार नारायण राणे साहेबांचा पहिला बालेकिल्ला हा फोंडा विभाग आहे.त्याचे नाव राख आणि मामा हळदिवे यांना निवडून द्या असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले.
शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार मामा हळदिवे म्हणाले, आजपर्यंत मी खासदार नारायण राणे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिलो. खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे जबाबदारी पेलली. आता महायुतीच्या माध्यमातून मला तिकीट मिळाले आहे. आजपर्यंत चा पूर्ण प्रवास मी आणि माझ्या कुटुंबाने जनतेच्या सेवेसाठी वाहून घेतले आहे.
माझी उमेदवारी ही फक्त माझी नाही तर तुम्हाला जनतेची उमेवारी आहे. त्यामुळे जनतेने माझ्या उमेदवारीला साथ देऊन भरघोस मतदान करून निवडून द्यावे. वहिवर लिहिलेलं खोडता येत पण हृदयात कोरलेल खोडता येत नाही असे म्हणत भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन सदानंद उर्फ बबन ( मामा ) हळदिवे यांनी केले.
शिवसेना उपनेते संजय आंग्रे म्हणाले, दादा जो देतील तो उमेदवार आणि सांगतील तो सभापती बनेल. बबन हळदिवे तळागाळात, प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात रुजलेले आहेत. त्यामुळे राणे साहेबानी दिलेली जबाबदारी पार पडणार असल्याची ग्वाही, शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांनी दिली.
माजी आ.रवींद्र फाटक म्हणाले, तुळशीदास रावराणे म्हणाले, खासदार नारायण राणे यांच्या पावलावर पाऊल ठेऊन पुढील दहा - तीस वर्षे कोणी उभं राहणार नाही, घट्ट पकड पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी निर्माण केलेली आहे. धनुष्यबाण आणि कमळ चिन्हसमोर बटन दाबून महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्यायचं आहे. खासदार नारायण राणेंनी विकासाचा धडा घालून दिला आहे. फोंडाघाट, घोंणसरी परिसर सुजलाम सुफलाम होईल, असा विश्वास तुळशीदास रावराणे यांनी व्यक्त केला.










