
वैभववाडी : आम.नितेश राणे यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर वैभववाडीतील भाजपा पदाधिकाऱ्यांनी नागपूर येथे त्यांच पुष्पगुच्छ व भगवत गीता पुस्तक देऊन अभिनंदन केले.भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली.
फडणवीस सरकारच्या मंत्री मंडळाचा आज विस्तार झाला. यामध्ये एकूण ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामध्ये कणकवली वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी शपथ घेतली.हा शपथविधी संपल्यानंतर वैभववाडीतील भाजपा पदाधिकाऱ्यांनी मंत्री राणे यांची भेट घतली.पुष्पगुच्छ व भगवत गीता देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र राणे, उपनगराध्यक्ष संजय सावंत आदी उपस्थित होते.