हिंदूंचा तिसरा डोळा उघडेल तेव्हा राहुल गांधींना महागात पडेल

नितेश राणेंची जोरदार टीका
Edited by: उमेश बुचडे
Published on: July 02, 2024 11:33 AM
views 207  views

मुंबई : देशाच्या संसदेत राहुल गांधी यांनी हिंदू समाजावर टीका केली. या देशात ९० टक्के हिंदू राहतात. आपला देश हिंदू राष्ट्र आहे. हिंदू शांत आहेत म्हणून तुम्ही काही लोकांना खुश करण्यासाठी अशी हिंदू विरोधी वक्तव्ये करत आहात. हिंदू शांत आहे म्हणून तुमचे हे सर्व प्रकार चालले आहेत. मात्र जेव्हा हिंदू अशांत आणि हिंसक होईल, हिंदू समाज जेव्हा तिसरा डोळा उघडेल तेव्हा राहुल गांधींना महागात पडेल असा इशारा भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी दिला.

ज्या विरोधी पक्षनेते आमदार यांना राहुल गांधीचे वक्तव्य चुकीचे वाटत नाहीत त्यांनी आधी आपण स्वतः हिंदू आहेत हे विसरू नये. नाहीतर ज्यांना खुश करण्यासाठी हिंदूंवर टीका करता ते १ टक्के सुद्धा देशात राहणार नाहीत, असे सुनावले.

मिलिंद नार्वेकर यांनी उमेदवारी देण्यावरून मातोश्रीवर महाभारत सुरू झाले आहे. आमच्या नार्वेकरांना शुभेच्छा आहेत. मात्र आदित्य ठाकरे आणि वरून सरदेसाई त्यांना शुभेच्छा देणार काय ते विचारा असे एका प्रश्नावर बोलताना नितेश राणे  यांनी सांगितले.

उध्दव ठाकरे हेच सेनेचे व्हीलन आहे. धर्मवीर एक मध्ये काही कपडे काढले आहेत आता दोन मध्ये त्यांचे सर्वच कपडे उतरले जातील, अशी सूचक टीका केली.