
देवगड : देवगड किल्ला येथील हनुमान मंदिरात सप्तप्रहरांच्या हरिनाम सप्ताहास कणकवली विधानसभा मतदार संघाचे आ. नितेश राणे यांनी भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांचे देवगड किल्ला ग्रामस्थ मंडळच्या वतीने शिवराम निकम यांनी स्वागत केले. या निमित्ताने नूतन देवगड मंडळ अध्यक्ष राजेंद्र शेट्ये यांचे भाजप नगरसेवक नगरसेविका तसेच पदाधिकारी यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस संदीप साटम उपाध्यक्ष प्रियांका साळसकर,नूतन तालुका अध्यक्ष राजेंद्र शेट्ये ,उपनगराध्यक्ष मिताली सावंत,माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, देवगड जामसंडे नगरपंचायत भाजप नगरसेवक, नगरसेविका पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.