नितेश राणे यांना पहिल्याच यादीत उमेदवारी

कार्यकर्त्यांमध्ये फटाके फोडून आनंद व्यक्त
Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 20, 2024 14:10 PM
views 245  views

देवगड : कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघातून आमदार नितेश राणे यांना भारतीय जनता पार्टीने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत उमेदवारी दिली आहे. 99 उमेदवारांची पहिली यादी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय कार्यालयाने जाहीर केली. यात आमदार नितेश राणे यांना उमेदवारी घोषित केली आहे. पहिल्याच यादीत ही उमेदवारी जाहीर झाल्याने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्तकेलाजातआहे.ठिकठिकाणी फटाके फोडून आनंद साजरा केला जात आहे.