
वैभववाडी : खांबाळे येथील श्री देवी आदिष्टी देवीच्या हरिनाम सप्ताह व जत्रोत्सवाला आम.नितेश राणेंनी भेट दिली. देवी आदिष्टीच दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी देवस्थान समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
या उत्सवाला उपस्थितांना श्री.राणे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपाचे मनोज रावराणे, सुधीर नकाशे, संजय सावंत, दिगंबर मांजरेकर, उमेश पवार, महेश चव्हाण व देवस्थान समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.