नीतेश राणेंनी जरांगे - पाटील यांच्या प्रकृतीची केली विचारपूस

Edited by: उमेश बुचडे
Published on: October 31, 2023 18:40 PM
views 665  views

कणकवली : मराठा आरक्षासाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे-पाटील यांची आमदार नितेश राणे यांनी फोन वरून संवाद साधत प्रकृतीची विचारपूस केली. आमदार नितेश राणे म्हणले, आरक्षण मिळणार आहेच, त्यात तुमचेच श्रेय आहे. मात्र, तुम्ही तब्येत सांभाळा. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी आता तब्येत चांगली आहे असे सांगितले.