
कणकवली : कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक आज 26 रोजी आहे आणि सकाळी सात वाजल्यापासून मतदाराला सुरुवात झाली आहे आमदार नितेश राणे यांनी सकाळच्या सत्रामध्ये रांगेत राहून आपल्या मतदानाचा हक्क कणकवली प्रांत कार्यालय येथील मतदान केंद्रावर बजावला आहे.
कणकवली तालुक्यामध्ये 22.75% म्हणजे जवळपास 23 टक्के मतदान आतापर्यंत झाले असून मतदानाचा टप्पा वाढण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यावेळी आमदार नितेश राणे यांनी सांगितले की महाविकास आघाडी पदवीधरांना न्याय देऊ शकत नाहीत महाविकास आघाडीचे कुठे नेते प्रचार करताना दिसले नाहीत. इलेक्शन कालावधीत स्वतःच्या उमेदवारासाठी सिंधुदुर्ग रत्नागिरीतिल मतदारांपर्यंत येऊ शकत नाहीत ते नेते कोकणाचा विकास करू शकतात काय हा साधा प्रश्न आहे. म्हणून ही निवडणूक एकतर्फी आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे विजयी होतील असा विश्वास देखील आमदार राणे यांनी व्यक्त केला