अबीद नाईकांना नितेश राणेंनी दिल्या शुभेच्छा...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: July 23, 2023 15:12 PM
views 404  views

कणकवली : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांचे पुष्पगुच्छ देऊन भाजप आमदार नितेश राणे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रात सध्या झालेल्या युतीची नांदी कणकवली मधूनच झाली असल्याचेही राणे यांनी सांगितले.

भविष्यात जिल्हाध्यक्षपदी राहून आपण  संघटना मजबूत करावी आणि चांगले काम करावे अशा शुभेच्छा त्यांनी नवीन जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांना दिल्या. यावेळी कणकवली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माझी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेवक अभि मुसळे, माजी नगरसेविका मेघा गांगण, राजश्री धुमाळे उपस्थित होते.