नितेश राणेंनी दिला शब्द पूर्ण केला | दुसरे विमानही चिपीवर दाखल

Edited by: प्रतिनिधी
Published on: August 22, 2022 19:39 PM
views 164  views

सिंधुदुर्ग : आमदार नितेश राणे यांनी जाहीर केलेले दुसरे विमान आज सिंधुदुर्ग विमानतळावर दाखल झाले. यावेळी मुंबई ते सिंधुदुर्ग नवीन विमानातून आलेल्या प्रवाशांचे भाजपातर्फे स्वागत करण्यात आले. या स्वागतासाठी भाजपा युवा मोर्चाचे प्रसाद पाटकर, सुनील चव्हाण, प्रणव वायंगणकर, सुधीर पेडणेकर, निलेश घोगळे आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग विमानतळावर १८ ऑगस्ट पासून सिंधुदुर्ग विमानतळावर अलाईंस एअरची नवीन विमान फेरी सुरु होईल अशी घोषणा आमदार नितेश राणे यांनी केली होती. मात्र, खराब हवामान असल्याने 18 रोजी हे दुसरे विमान येऊ उतरू शकले नाही. मात्र, सोमवारी संध्याकाळी ४.२० ला हे दुसरे विमान सिंधुदुर्ग विमानतळावर उतरले. या विमानातून उतरलेल्या प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. 5 वाजता हे विमान पुन्हा मुंबईला रवाना झाले.