ए जी डॉटर्स कंपनीच्या माध्यमातून नितेश राणेंनी केली फसवणूक

सुशांत नाईक यांचा गंभीर आरोप
Edited by: उमेश बुचडे
Published on: October 14, 2022 20:11 PM
views 189  views

कणकवली : कणकवली शहरातील कचरा डेपोची जमीन ए जी डॉटर्स या कंपनीला कचरा प्रकल्पासाठी भाड्याने जमीन दिली. त्याचवेळी हा प्रकल्प बोगस असल्याचे आम्ही सांगितले होते. आता या जमिनीचे भाडे केव्हा वसूल होणार ? हे सत्ताधाऱ्यांनी जाहीर करावे, बोगस ए जी डॉटर्स कंपनीच्या माध्यमातून नितेश राणेंनी फसवणूक केल्याचा आरोप शिवसेना नगरसेवक सुशांत नाईक यांनी केला आहे.


नगरपंचायतने ए जी डॉटर्स या कंपनीला जमीन करार पद्धतीने दिली. बंडू हर्णे म्हणतात,जमीन ताब्यात दिली नाही. मग त्या जमिनीवर कुंपण व काही कामे कशी झालीत?  उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी जनतेची दिशाभूल थांबवावी. 


नगरपंचायत सत्ताधारी लोकांनी जमीन बोगस ए जी डॉटर्स च्या घशात घातली आहे. त्याला आमदार नितेश राणे व कणकवली नगरपंचायत सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप सुशांत नाईक यांनी केला आहे.