
वैभववाडी : उंबर्डेतील उबाठा गटाचे शाखाप्रमुख तथा ग्रामपंचायतचे माजी सदस्य रमेश साळवी सेनेला जय महाराष्ट्र केला आहे. आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत त्यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे. सर्व प्रवेश कर्त्यांचे आमदार नितेश राणे यांनी पक्षात स्वागत केले.
आम.नितेश राणेंचा आज वैभववाडी तालुक्यात गावभेट दौरा होता. यावेळी तालुक्यातील उंबर्डे येथील श्री साळवी यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांच्या सोबत विशाखा सकपाळ, शशिकांत जाधव, जगन्नाथ जाधव, सतीश मोरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपच कमळ हाती घेतले.
यावेळी जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे, प्रमोद रावराणे, जयेंद्र रावराणे, नासीर काझी, भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, संजय सावंत, हुसेन लांजेकर, प्राची तावडे, अतुल सरवटे, किशोर दळवी, रोहन रावराणे, वैभवी दळवी, स्वप्नील खानविलकर व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
उंबर्डे गावच्या विकासासाठी आमदार नितेश राणे यांनी भरघोस निधी दिला आहे. यापुढे देखील गावचा विकास आमदार नितेश राणेच करू शकतात. असा विश्वास श्री. साळवी यांनी व्यक्त केला.