कणकवली मतदारसंघात यापुढे आरोग्याचा प्रश्न उभा राहणार नाही !

आरोग्यमंत्र्यांनी दिली ग्वाही : आ‌ नितेश राणे
Edited by: विनायक गावस
Published on: December 13, 2023 15:47 PM
views 187  views

नागपूर : कणकवली, देवगड व वैभवाडीतील आरोग्याचे असंख्य प्रश्न होते. काही पदभरती करायची होती. तर कॉट्रॅक्ट बेसवरील कर्मचारी वर्गाचा पगाराचाही प्रश्न होता. या सर्वांसंदर्भात आरोग्यमंत्री यांनी त्यांच्या दालनात माझा मतदारसंघापूरती बैठक लावली होती. सगळे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.

सर्वप्रश्न सोडविण्यासाठी यावेळी चर्चा झाली. येणाऱ्या काळात कुठेही आरोग्याचा प्रश्न उभा राहणार नाही असा विश्वास आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी यावेळी आपणास दिल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केली. कोकणसाद LIVE चे प्रतिनिधी दीपेश परब यांनी त्यांच्याशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.