
देवगड : मोबाईल नेटवर्कची सुविधा मिठबांव गजबादेवी परिसर येथे उपलब्ध व्हावी यासाठी पालकमंत्रि नितेश राणे यांच्याकडे रविंद्र फाटक यांनी मागणी केली. देवगड तालुक्यातील मिठबाव येथील गजबादेवी मंदिर येथे वर्धापन दिनानिमित्त आयोजित सत्यनारायण महापूजा कार्यक्रमप्रसंगी नितेश राणे यांच्या जवळ ही मागणी करण्यात आली.
यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे,उपजिल्हा प्रमुख बापू धुरी, मिठबांव सरपंच भाई नरे व ग्रामस्थ मंडळी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच गजबादेवी मंदिर परिसरात उच्च दाबाने होत असलेल्या विद्युत पुरवठ्यामुळे पर्यटकांना आणि नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच, कोणत्याही मोबाईल कार्डला नेटवर्क नसल्यामुळे पर्यटकांना अडचण निर्माण होत आहे,याबाबत निवेदन मंत्री नितेश राणे यांना रविंद्र फाटक यांनी दिले. यावर लवकरात लवकर निर्णय घेवून प्रश्न मार्गी लावले जातील असे आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी दिले. यावेळी मंत्री नितेश राणे यांचा शाल ,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन रवींद्र फाटक यांंच्याकडुन सत्कार करण्यात आला.