देशात संविधानाला मजबुती देण्याचे काम मोदींनी केले : नितेश राणे

Edited by:
Published on: January 25, 2025 18:11 PM
views 232  views

कणकवली : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाकडे वाकड्या नजरेने  पाहणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची योग्य ती जागा दाखवून दिलेली आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर खऱ्या अर्थाने संविधान मजबुतीने,तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे आणि संविधानाचे पालन करण्याचे काम करण्यात आले. पाकिस्तान, चीन,बांगलादेश यासारख्या देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान स्वीकारले असते तर आज त्यांची ही दयनीय अवस्था झाली नसती. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उद्योग आणि बंदरे विकास मंत्री सदा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

कणकवली तालुक्यातील सांगवे या गावी भारतीय जनता पार्टी आयोजित संविधान गौरव अभियान कार्यक्रमाचे उद्घाटन मत्स्य उद्योग  व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजप अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोट्या सावंत, माजी सभापती अंकुश जाधव, सांगवी सरपंच संजय सावंत, अशोक कांबळे, तांबे,  फोंडेकर,चव्हाण,विजय भोगटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

२०१४ नंतर काँग्रेस सरकार गेले आणि त्यानंतर मोदी सरकार आले. संविधान कडे वाकड्या नजरेने पहण्यार्यान थांबविण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले.आमदार ,खासदार, मंत्री ही पदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच आम्हाला मिळतात डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांचा मी अभ्यासक आहे. त्यांचे विचार मी नेहमीच आत्मसात करतो असेही मंत्री नितेश राणे म्हणाले. भारत संविधान मानणारा देश देश आहे त्यामुळे संविधानाचा ३६५ दिवस गौरव केलेला पाहिजे. भारतीय जनता पार्टीचा पर्याय प्रत्येक कार्यकर्ता हे काम करत राहील पालकमंत्री निलेश राणे यांनी व्यक्त केला.