देवगड : देवगड तालुक्यातील ठिकठिकाणच्या देवगड - जामसंडे येथील गणपतींचे आमदार नितेश राणे यांनी आज दर्शन घेतले. नागरिकांनीही त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. त्यांच्या समवेत संदीप साटम, बाळ खडपे, योगेश पाटकर, राजेंद्र शेटे यांच्यासह अनेक भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. गणेश दर्शनाच्या निमित्ताने आमदार घरी आल्यावर त्यांच्या समवेत फोटो सेल्फी घेण्यासाठी गर्दी झाली होती.