
वैभववाडी : आ. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीचे नगरसेवक प्रदीप रावराणे यांनी वाभवे येथील स्वामी समर्थ मंदीरात अभिषेक करण्यात आला.आमदार राणेंना दिर्घायुष्य मिळावं तसेच येणाऱ्या मंत्री मंडळ विस्तारात त्यांना मंत्रीपद मिळाव असं साकडं स्वामी समर्थ मंदीरात केलं.यावेळी उपनगराध्यक्ष संजय सावंत, नगरसेवक प्रदीप रावराणे, सुभाष रावराणे,नारायण मांजरेकर यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.