मोंड कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्याची नितेश राणेंनी केली पाहणी

Edited by: नागेश दुखंडे
Published on: June 17, 2024 12:08 PM
views 111  views

देवगड : देवगड तालुक्यातील मोंड गावातील मोंड कॉलेज ते गावठाण कडे जाणाऱ्या रस्त्याची पाहणी आमदार नितेश राणे यांनी केली रस्ता तातडीने वाहतुकीस योग्य करा अशी संबंधित यंत्रणेला आमदार राणे यांनी सूचना दिल्या आहेत. या रस्त्यावरील घाटीचा सुमारे 200 मीटरचा रस्ता काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे वाहून गेला होता. 

देवगड तालुक्यात शनिवारी सकाळी पडलेल्या पहिल्याच पावसामुळे या पावसाचा फटका मोंड गावाला बसला होता. या गावातील मोंड कॉलेज ते गावठणकडे जाणारा सुमारे 200 कि. मी. चा डांबरी रस्ता मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी वाहून गेला आहे. या रस्त्यावरील घाटीरस्ता अक्षरशः उखडून गेला आहे. या घाटीरस्त्याचे डांबरीकरण पूर्णतः पाण्यात वाहून गेले आहे. या रस्त्यानजीक जलजीवन योजनेच्या पाईपलाईनसाठी गटारे खोदण्यात आली होती. मात्र, हे काम अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे या गटारात पावसाचे पाणी अडून घाटीरस्ता उखडून गेला होता. रस्त्यानजीक चार ते पाच फूटाचे चर पडले असून नजीकच्या वाडीत या चराची माती पाण्याच्या बदलेल्या प्रवाहाने वाहून जात तेथील घरांच्या मागील बाजूने घरात घुसली . यात सुमारे पाच ते सहा घरे बाधित झाली होती. वाडीकडे जाणारा हा घाटीरस्ता शेतकऱ्यांची कायमस्वरुपी ये- जा करण्यासाठीची मार्ग असून घाटीच्या वाहून गेलेल्या मातीमुळे या घाटीरस्त्यावर चालणेही मुश्किल झाले होते. या सर्व गोष्टींची पाहणी आमदार नितेश राणे यांनी करून संबंधित यंत्रणेला त्या पद्धतीच्या सूचना देखील यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिल्या आहेत.

आज आमदार नितेश राणे यांनी तातडीने मोंड गावात जाऊन या रस्त्याची खास पाहणी केली व  त्यावेळी या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट असल्याचे लक्ष्यात येताच संबंधित यंत्रणेला तातडीने रस्त्याची डागडुजी करण्याच्या सूचना आमदार  नितेश राणे यांनी दिल्या आहेत. यावेळी त्यांच्या सोबत उपसरपंच अभय बापट,जिल्हा उपाध्यक्ष संदीप साटम, बाळ खडपे आदी पदाधिकारी उपस्थित होते.