दोडामार्गच्या पर्यटन सेवेत रुजू होणार ' कुबल ' यांचं 'निसर्ग फार्म'

Edited by:
Published on: April 06, 2024 10:54 AM
views 250  views

दोडामार्ग : निसर्गाचं अमाप वरदान लाभलेल्या दोडामार्ग तालुक्यात पर्यटकांच्या सेवेत रुजू होतंय हक्काचं "निसर्ग फार्म' पर्यटन केंद्र. दोडामार्ग तालुका हा निसर्ग, कृषी व इको पर्यटनसाठी हॉट स्पॉट बनत असताना विश्राम कुबल व त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या शेती बागायतीतच सुरू केलेलं निसर्ग फार्म पर्यटकांसाठी खास पसंदिस ठरेल यात शंका नाही. उद्या रविवारी ०७ एप्रिल ला या *निसर्ग फार्म* चा शानदार उदघाटन सोहळा आयोजित करण्यात आला असून ते पर्यटकांच्या सेवत रुजू होणार आहे. अस्सल शेतात आणि बागायतीत उभारलेले निसर्ग थांब फार्म खऱ्या अर्थाने येथे येणाऱ्या पर्यटकांना निसर्ग निवासाची अद्भुती देणार आहे.


एकूण चार प्रशस्त रूम असून पर्यटकांसाठी आवश्यक सर्व लक्झरी सुविधा यात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नारळ, सुपारी  - फोफळी, काजू बागायती आणि भात शेती अशा अस्सल शेत बांधावर व निसर्गाच्या सानिध्यात, प्रसिध्द कसई नाथ डोंगराच्या पायथ्याशी दोडामार्ग तिलारी राज्य मार्गालगत हे फार्म आहे. कसई, दोडामार्ग (गोवूळवाडी)  येथे हे फार्म उभारण्यात आलय. दोडामार्ग शहरापासून अवघ्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावर हे फार्म असल्याने पर्यटकांच्या अतिशय सोयीचं हे ठिकाण असणार आहे इतकंच नव्हतं गोव्यासारख्या आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळापासून अवघ्या तासाभराच्या अंतरावर हे ठिकाण आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळ, थिविम रेल्वेस्टेशन आणि तिलारी सारखे जागतिक जैवविवीधतेन समृद्ध असलेला तीलारीचा परिसर हे सारं काही अवघ्या तासा भराच्या अंतरात असल्याने पर्यटकाना हे मोठं सोयीचं केंद्र ठरणार आहे. इथे निसर्गाच्या सानिध्यात राहूनही गोव्याला सारख्या आंतर राष्ट्रीय पर्यटन स्थळावरील सागरी किनाऱ्याचा आणि तिलारी सारख्या समृद्ध निसर्ग संवर्धन क्षेत्राचा मनमुराद आनंद पर्यटक घेणार आहेत.


अतिशय कल्पक बुध्दीने आणि हुशारीने या फार्म ची निर्मिती करण्यात आलीय.  आपल्या शेतावर उभारणी केलेली या पर्यटन स्थळी फार्म वर एक भात शेती मध्ये धनेश या नावाने उभारणी केलेला हर्ट खास लक्षवेधी ठरतो आहे. तर इथे अस्सल मालवणी व सर्व प्रकारचे जेवणही उपलब्ध असल्याने पर्यटकांना खास मालवणी मेजवानी आणि शेती बागायतीत उपलब्ध असलेल्या मेजवानीचा मनमुराद आनंद घेता येणार आहे. उद्या रविवारी उद्घाटन झाले नंतर हे फार्म हाऊस पर्यटकांसाठी खुले होणार असून पर्यटकांनी त्याचा आस्वाद घ्यावा असं आवाहन फार्म चे मालक श्री. विश्राम बाबाजी कुबल,  सौं. विलासिनी विश्राम कुबल यांसह प्रियांका प्रेमानंद कुबल, निखिल प्रेमानंद कुबल, निलेश, साईल, दिव्या, सोनिया, आचल आदींनी केलं आहे.  अधिक अमितीसाठी  ९४२१२६१७४० या नंबर वर संपर्क साधता येणार आहे.