
सावंतवाडी : निरवडे कोनापाल गावात नेमळे गावच्या सीमेला लागून असलेल्या बांदिवडेकरवाडीमध्ये निरवडे आणि नेमळे गावाला जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर एक नदी असून त्या नदीवर पुलाचे बांधकाम साधारपणे फेब्रुवारी मध्ये सुरू झाले होते. मात्र ठेकेदाराने हे काम व कामाचे गांभीर्य जाणून न घेता वेळकाढूपणाचे धोरण अवलंबून कासवाच्या गतीने काम सुरू ठेवले होते. या कामाबाबत संबंधित यंत्रणेला वाडीतील माणसांनी तोंडी सूचना केल्या होत्या. पण, त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले.
यातच काल झालेल्या मुसळधार पावसाने नदीवर तयार केलेला कमकुवत बायपास रस्ता वाहून गेला आणि बांदिवडेकरवडीचा संपर्क तुटला. वाडीतून विद्यार्थी , मोलमजुरी ,व्यावसायिक वर्ग ,कर्मचारी वर्ग यांचे यामुळे हाल होत आहे. १ किमी अंतर जाण्यासाठी १० किमी अंतरावरून जावे लागत आहे. तत्काळ काम युद्ध पातळींवर सुरू नाही झाले राज्य स्तरावर पुरस्कार पात्र ग्रामपंचायतमध्ये येत्या काही दिवसात धरणे आंदोलन छेडण्याचा तयारीत बांदिवडेकर वाडीतील ग्रामस्थ आहेत. वरिष्ठ यंत्रणेकडून याची तत्काळ दखल घेऊन ही काम पूर्णत्वास न्यावे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. तसेच एवढी मोठी घटना घडून सुद्धा अद्याप सरपंच किंवा कोणताही शासकीय अधिकारी पाहणीसाठी आला नसल्याची खंत ग्रामस्थानी व्यक्त केली आहे.