निरवडेवासियांना पर्वणी ; महोत्सवास शुभारंभ

Edited by: विनायक गांवस
Published on: April 04, 2026 13:30 PM
views 102  views

सावंतवाडी : निरवडे महोत्सव-२०२६ चा भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, जि. प. सदस्य संदीप गावडे आदींसह मान्यवर उपस्थित होते. हा महोत्सव निरवडेवासियांसाठी पर्वणी ठरला आहे.

निरवडे ग्रामस्थांच्या सहकार्याने श्री देव महापुरुष कला क्रीडा मंडळांने आयोजित केलेल्या भव्य आणि दिव्य अशा "निरवडे महोत्सव २०२६" चे जल्लोषी वातावरणात उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून भाजपा युवा नेते विशाल परब यांची उपस्थिती लाभली. यावेळी कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर,  सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती सुष्मिता जाधव, तळवडे मतदार संघातील जिल्हा परिषदेचे सदस्य संदीप गावडे, सावंतवाडी पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक, प्रमोद गावडे आदी उपस्थित होते. 

या कार्यक्रमातून निरवडे गावचा कला संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी आपली सकारात्मक साथ नेहमीच लाभणार असल्याचा विश्वास विशाल परब यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे आयोजन समस्त निरवडे ग्रामस्थ आणि श्री देव महापुरुष कला क्रीडा मंडळ माळकरवाडी यांच्यावतीने अत्यंत सुनियोजित पद्धतीने करण्यात आले होते. या महोत्सवासाठी केतन आजगावकर ( भाजपा सोशल मीडिया प्रमुख सावंतवाडी ), महेंद्र गावडे (तंटामुक्ती अध्यक्ष), दादा परब ( ग्रा. सदस्य तळवडे ) निखिल माळकर ( अध्यक्ष ), सुनिल माळकर ( उपाध्यक्ष ) , अर्जुन पोपकर ( सचिव) , चंदन गोसावी,  श्री. तिवरेकर ( मार्गदर्शक ) , विशाल पोपकर ( खजिनदार ) , सदस्य - चेतन माळकर, सचिन माळकर, नितेश माळकर, विराज पोपकर, संजय माळकर, राजाराम माळकर , किशोर माळकर आधी मान्यवरांची उपस्थिती देखील होती. चटकदार फूड फेस्टिवल आणि सांस्कृतिक रंगतदार कार्यक्रमांची मेजवानी हे या महोत्सवाचे खास आकर्षण ठरले होते.