
सावंतवाडी : महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांनी आज सावंतवाडी येथील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग आणि शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
याभेटीदरम्यान आमदार डावखरे यांनी उपस्थित भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी विविध विषयांवर मनमोकळी चर्चा केली. त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्याशी संवाद साधला. आमदार निरंजन डावखरे यांनी यावेळी विविध शालेय संघटना, शिक्षक संघटना आणि अन्य संघटनांकडून आलेल्या निवेदनांचा स्वीकार केला. या निवेदनांमध्ये मांडलेल्या मागण्या आणि समस्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरेगावकर, माजी सभापती तथा जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, आंबोली मंडळ अध्यक्ष संतोष राऊळ, प्रसन्न उर्फ बाळू देसाई, माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे, माजी नगरसेवक आनंद नेवगी, सिद्धेश तेंडुलकर, मिसबा शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार डावखरे यांच्या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता.